उत्तम अभियंता काळाची गरज...जगाचा नियंता एक उत्तम अभियंता
१५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिन कृपया लेखानंतरची कविता सुद्धा वाचा ज्ञानप्राप्ती मुळे मनुष्य ज्ञानसंपन्न तर अनुभवामुळे अनुभवसिद्ध होतो. अनुभव व ज्ञान याचे योग्य मिश्रण जीवन जास्तीत जास्त समृद्ध करण्यासाठी अभियंत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.आहे त्या परिस्थितीत , उपलब्ध साधनसामुग्री मध्ये कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्च करून उत्तमात उत्तम पर्याय देतो तो अभियंता. समस्यांचे व अशक्यतेचे शक्यतेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे अभियंता. सहजता हा त्याचा स्वभाव. चिकाटी हा त्याचा गुणधर्म. केवळ पुस्तकी ज्ञान (Theory) मधून उत्तम अभियंते घडत नाहीत. त्याला व्यवहारिकतेची जोड गरजेची असते. ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग झाला तरच त्याचे महत्त्व विषद होते (application of knowledge is most important.) एखादी गोष्ट केवळ साध्य करणे हे अभियंत्याचे अंतिम ध्येय नसावे. कारण ती गोष्ट अजुन सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात असतो. अवघड गोष्टी सोप्या बनवताना सहजता जपणे हे अभियंत्याचे कौशल्य आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा समावेश होई...