संक्रमण हाच स्थायीभाव
संक्रमण म्हणजे काय? तर स्थित्यंतर, परिवर्तन किंवा मोठा बदल . एका स्थितीतून दुसर्या स्थितीत जाणे.... सध्या देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीची स्थित्यंतर अनुभवत आहे. आज 50 ते 60 या वयादरम्यान असलेल्या पिढीने सर्वात जास्त स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत. तंत्रज्ञानातील स्थित्यंतर आहे, जीवनशैलीतील स्थित्यंतर आहे. शिता कडून उष्णाकडे जाणारे संक्रमण, अज्ञानाकडून ज्ञानाच्या दिशेने होणारे संक्रमण, अंधारातून उजेडाकडे जाणारे संक्रमण म्हणजेच संक्रांत. देवीने संकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला तो दिवस म्हणजे संक्रांति.प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो. वर्षात एकूण बारा महिने असतात. म्हणजे वर्षात एकूण बारा संक्रांती येतात. सूर्य ज्या वेळी मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांत होय. जवळपास सर्व सण तिथी नुसार साजरे होतात. परंतु संक्रांत मात्र 14 किंवा 15 जानेवारीला निश्चित येते. याचे कारण हा सण सौर कालगणनेवर आधारित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बरोबर एक वर्षांनी पुढची मकर संक्रांत येते. लीप ईयर असेल तर संक्रांत 15 जा...