कठीण काळ एक वरदान
आलिया भोगासी असावे सादर.... चित्ती असू द्यावे समाधान...... चांगला काळ, कठीण काळ प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. न नित्यम् लभते दुःखम्, न नित्यम् लभते सुखम् सुखदुःखाचे हे चक्र म्हणजेच जीवन, आयुष्य. कठीण काळ टाळता येत नाही परंतु योग्य आचरणाने त्यातून बाहेर पडता येते. विहीर नेहमी उन्हाळ्यातच खणतात. उन्हाळ्यात पाणी लागले तर पाण्याची कधीच कमतरता पडत नाही तसेच कटरीना कठीण प्रसंगात माणूस सतत टिकून राहिला तर आयुष्यात कधीच डगमगत नाही. कठीण दिवसात कसोटीच्या काळातच माणसाला स्वतःची ओळख पटते. याच काळात त्याला जगाचे खरे स्वरूप समजते. आनंदाच्या काळात सगळेच आपले असतात. त्यामुळे आपला परका कोण या काळामुळे समजते. वाईट काळात मित्रांची परीक्षा होते. कसोटीच्या काळामध्ये श्रद्धा व भाव जागृत होतात. मनुष्यामध्ये अंतर्बाह्य बरेच बदल होतात. त्यातली उत्कटता जागी होते. चांगल्या काळात अनेक आवडत्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. माणूस स्वतःची ओळख विसरलेला असतो. त्यामुळे विपत्ती काळात त्याच्या दुर्लक्षिलेल्या कला, जाणिवा पुन्हा जागृत होतात. मनुष्य अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करायला लागतो. चा...