Posts

Showing posts from February, 2022

शिव,शक्ती आणि समाज

Image
शिव,शक्ती आणि समाज देवाधिदेव महादेव शंकर हा इतर  देवांपेक्षा वेगळा आहे. उत्पत्ती, पालन आणि लय यातील शेवटची जबाबदारी महेशाची. महाप्रलयाची देवता असूनही प्रसंगी तारणहार  होणारा, शीघ्रकोपी असूनही भक्तांवर लगेचच प्रसन्न होणारा हा देव आहे. शिव म्हणजेच सत्य, शिव म्हणजे साधेपणा, शिव म्हणजे सहजता. स्वभाव अतिशय भोळा, राहणीमान अत्यंत साधे, आवडीनिवडी म्हणजे  सहज उपलब्ध होणारे घटक.एकांत प्रिय असणाऱ्या शंकराचे हिमालय/कैलास हे मूळ स्थान आहे. प्रसंगी स्मशाभूमीत वास करणारा हा देव आहे. एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे गरज पडल्यावर सर्व देवांना सुद्धा याचा आधार वाटतो. समुद्रमंथनात उत्पन्न झालेले विष आनंदाने प्राशन केलेला हा शंकर आहे. विषामुळे त्याचा कंठ काळानिळा झाला आहे, म्हणूनच तो निळकंठ आहे. यावर सर्वांगाची आग झाली आणि उपाय म्हणून त्यांने स्मशानातील राख भस्म म्हणून अंगाला लावून घेतली. आणि तरीही आग कमी होईना म्हणून राम नामाचा जप केला.   समाजात अमृत पिण्यासाठी सारेच सज्ज असतात. पण समाजासाठी, देशासाठी काही सोसायचे असते तेंव्हा मोजकेच भोळे सांभ विष प्राशन करण्यासाठी अग्रेसर असतात. अशां...

आमटी भात

Image
आमटी भात या विषयी आदराची भावना करणारा व खाणारा यांच्यात असायला हवी. आमटी हे एक पक्वान्न आहे या भावनेने पूर्णपणे एकाग्र होऊन आमटी करणे गरजेचे असते. अशा भावनेने केलेली आमटी व वाफेचा भात हे भाग्यवान लोकांच्याच नशिबात असतात. आमटी अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट असू नये. पदार्थांचा अति वापर नसावा. अति मसालेदार व जळजळीत देखील नसावी. ओले खोबरे, कोथिंबीर, कसुरी मेथी, कढीलिंब हे घटक आवर्जून हवेतच. फोडणी करणे म्हणजे आमटी करणाऱ्याची पहिली परीक्षा. मोहरी पूर्णपणे तडतडायला हवी. त्यामध्ये हळद घातल्यावर ती करपणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. तसेच हिंग देखील फोडणीतच घालावा.  मसाला हा आमटीचा मुख्य घटक. गोडा मसाला, कांदा लसूण चटणी, गरम मसाला असे मसाल्याचे विविध प्रकार    वापरावेत. फोडणी झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता ,टोमॅटो , कांदा,कोथिंबीर इत्यादी साहित्य खमंग परतून घ्यावे अगदी तवंग सुटेपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण चटणी, गोडा मसाला, कसुरी मेथी, गरम मसाला चवीनुसार घालावा. नंतर त्यामध्ये वरण घालून चांगले चटचटायला लागले की मग त्यात उकळते पाणी घालावे. वरण शिजवताना त्यामधे काही मेथीचे द...

शतदा प्रेम करावे

Image
शतदा प्रेम करावे   या जीवनात नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. मिळालेल्या जन्माचे सार्थक करणे मनुष्याच्या हातात आहे. आयुष्य म्हणजे सुखदुःखाची गुंफण. चक्र ज्याप्रमाणे फिरत राहते   , खालची आरी वर जाते वरची आरी खाली येते त्याप्रमाणेच सुख वा दुःख कायम राहत नाही. जीवन ही एक तपस्या आहे. जीवन जगण्याची हातोटी ही एक कला आहे. आयुष्य कधीही  स्थिर राहत नाही. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ते अखंड वाहत असते. मात्र या प्रवासात आपल्या मार्गात हिरवळ फुलवत राहणे, न थांबता चालत राहणे, अडथळ्यातून अडचणींतून मार्ग काढत राहणे म्हणजेच आयुष्य. म्हटलं तर अडचणींचा पाढा वाचण्यासाठी आयुष्यही कमी पडेल. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहता यायला हवं. अर्धा ग्लास रिकामा आहे का अर्धा ग्लास भरलेला आहे हा नेहमीचा प्रश्न. पण ग्लास हा नेहमीच पूर्ण भरलेला असतो कारण पाणी अर्धे झाली तरी उरलेल्या ग्लासमध्ये हवा भरलेली असते . शाळेत असताना वामन कृष्णराव चोरघडे यांचा एक अम्मा नावाचा धडा होता. यातील आम्हा नावाचे पात्र लेखकाकडे घरकाम करण्यासाठी येत असे. एके दिवशी थंडीत भल्या पहाटे लेखकाने तिला विचारले, अम्मा तु...

शिक्षणाची नवी क्षितिजे उलगडताना........

Image
  नवी क्षितिजे उलगडताना........ आमच्या लहानपणीचे दिवसच निराळे होते. आयुष्याला केवळ दोनच पैलू होते. एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे शाळा. त्याकाळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले नव्हते. कदाचित आजच्यासारखे प्रोफेशनल ,कॉम्पिटिटिव्ह ऍप्रोच त्या शिक्षण व्यवस्थेकडे फिरकले नसावेत. शिक्षक म्हणून बरेच वर्षे काम केल्यानंतर आजची शिक्षकाच्या नजरेतून अनुभवलेली व्यवस्था आणि त्या काळी एका साध्याभोळ्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून पाहिलेली व्यवस्था या प्रचंड तफावत तर नक्कीच जाणवत आहे.  माणसं तर सगळी तीच आहेत. अंतरंगातले शिक्षक तसेच आहेत विद्यार्थी, संस्था, इमारती यांचे मूळ स्वरूप सुद्धा तंतोतंत असेच आहे. काहीच बदललेले नाही. परंतु दुर्दैव आहे की मूळ रूपावर एवढी बाह्यावरण आहेत की मूळ रूप कुठेतरी झाकलं गेलं आहे. आत्मा आहे पण दिसत नाही त्याची जाणीव मात्र निश्चित होते अशीच काही अवस्था आहे. अवस्थेला जबाबदार आहे ती व्यवस्था. दोन्ही काळातील व्यवस्था आणि व्यवस्थापन पद्धती यात प्रचंड बदल झालेला आहे. शिक्षकांनी शिक्षा करण्याची छडी मारण्याची मुभा पालकांनीच दिलेली असायची. शिक्षक संपूर्ण वर्गात नावानिशी ओळखत असायचे...