धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
नमस्ते, हिरण्यकशयपू सारख्या दैत्यांना आपल्या शक्तीचा गर्व, अहंकार होतो व याद्वारे ते समाजाचे शोषण करू लागतात. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही असे त्यांना वाटते. असा शक्तीचा उन्माद झालेले हे दैत्य जेव्हा सर्व सीमा ओलांडतात तेंव्हा परमेश्वर म्हणजेच सकारात्मक शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार धारण करून अशा दैत्यांचा नाश करतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ जेंव्हा एखाद्याकडे का हीच नसते, तेंव्हा काही मिळविण्यासाठी, तो संघर्ष सुरू करतो. या संघर्षात त्याला स्वतःचे मूल्य समजते. तो आपल्या क्षमता ओळखतो. आपल्या क्षमतेनुसार उद्दिष्ट ठरवून कठोर साधना करतो. सातत्य, चिकाटी ,साधना या सर्वांमुळे उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर मात्र काही वेळेस प्राणिमात्राला अहंकाराची बाधा होते. तो स्वतःला सर्वशक्तिमान मानू लागतो. जगातल्या कोणत्याही गोष्टी सामर्थ्याने व पैशाने , बळाच्या जोरावर प्राप्त करता येतात असा त्याचा समज होतो. परिणामी तो इतरांना तुच्छ मानू लागतो. साधनेमुळे ...