आपले भविष्य...आपली युवाशक्ती
माणसाने आयुष्यामध्ये जगावं कसं, व्यवहार कसा असावा, अत्यंत बिकट परिस्थितीत संकटांचा सामना करत यश कसे मिळवावे, लोकसंग्रह कसा करावा, सर्व सत्ता असूनही संन्यस्त व निस्वार्थी वृत्तीने कसे जगावे या सर्व प्रश्नांचे एकच अचूक उत्तर आहे. ती म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास. पूर्वी घरगुती उपचार म्हणजेच आजिबाईंचा बटवा असायचा. त्याप्रमाणे प्रत्येक समस्येवर उपाय देणारे रामायण, महाभारत, भगवद्गीता, शिवचरित्र घरोघरी असायलाच हवेत. रामायण आणि महाभारत यातील सर्वच प्रसंग हे प्रेरणादायी आहेत. लहानपणी छत्रपतींना मातोश्री जिजाऊंनी राम, कृष्णाच्या कथा ऐकवल्या. प्रत्यक्ष परिस्थितीशी झुंजत व परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवराय घडले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आम्ही आमच्या कपाळाला मोठ्या अभिमानाने लावतो. या पावन भूमीत जन्मलेल्या प्रत्येकालाच छत्रपतींचा वारसा आणि आशीर्वाद जन्मतः प्राप्त आहेत. हे सर्व आम्ही जाणतो. शिवरायांना कोटी कोटी वंदन करतो. पण पुढे काय ? शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग आम्हाला जगण्याचे बळ देतो, परिस्थितीशी लढायला शिकवतो यातून खरंच आणि काही बोध घेतो का ? अमृत समो...