Posts

Showing posts from March, 2023

घराघरात राम ..मनामनात राम

Image
*रामभक्त हो आपणही वाचा आणि शक्य झाल्यास पुढे पाठवा* प्रभू राम आमची अस्मिता..... प्रभू श्रीराम ही आमची प्रेरणा आहे. श्रीराम ही केवळ आस्था नाही तर आमच्या जीवनाचे सार्थक आहे.सर्व संदेह जिथे मावळतात ते अंतिम सत्य म्हणजे श्रीराम. आमच्या विजयाची गाथा ज्याला आम्ही श्रद्धापूर्वक अर्पण करतो ती प्रेरणा म्हणजे प्रभू रामचंद्र. आमच्या पराजयावेळी आम्हाला आत्मचिंतन करविणारी शक्ती म्हणजे प्रभू राम.  केवळ आमचा नव्हे तर अखिल विश्वाचा नियंता राम आहे, म्हणून तर समर्थ अभिमानाने सांगतात,  " आम्ही काय कुणाचे खातो, गुण रघुरायचे गातो !   त्रिभुवन पालक स्वामी तो राम आम्हाला देतो " जिथे राम नाही तो स्वर्ग, त्रिभुवनाची सत्ता आम्ही नम्रपणे झिडकारून देतो. " नसे राम ते धाम सोडून द्यावे ! ". आमचे हे दैवत सज्जनांचे कैवारी व दुर्जनांचा कर्दनकाळ आहे. राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणारे आहे. धर्माचे, न्यायचे , नीतीचे पालन करताना स्वतः कष्ट सोसून आदर्श निर्माण करून देणारे आहे. आदर्श बंधू, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श राजा किती म्हणून वर्णन करायचे, आयुष्य वेचले तरी कमी पडेल. धीर, वीर, गंभीर, पराक्रमी, न्य...

आरोग्यदायी कडुलिंब लोक आवडीने खातील

Image
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन करण्यांचं विशेष महत्त्व आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण चवीने खातील अशी कडुलिंबाची गोळी एकदा करून तर पहा. भाजलेले शेंगदाणे, कडुलिंबाची कोवळी पाने, चवीनुसार मिरची, जिरे,  मीठ आणि गूळ मिक्सर मध्ये अथवा कुटून एकजीव करून त्याच्या वाटाण्याएवढया गोळ्या तयार कराव्यात. मीठ आणि मिरची चवीनुसार घालावी. गोळी चघळून खावी. तोंडाला चव येते. सर्वजण आवडीने खातात.उत्तम आरोग्यासाठी कडू ,आंबट, तिखट ,गोड, खारट ,तुरट या सर्व रसांचे संतुलन अतिशय महत्त्वाचे आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबासह अन्य पदार्थ एकत्रित करून प्रसाद तयार केला जातो. उन्हाळा बाधू नये तसंच आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कडुलिंबाची पाने व गूळ याचे एकत्रीत सेवन फायदेकारक आहे. पित्त, भूक न लागणे, पोटदुखी, त्वचाविकार, तोंडाचे विकार यासासह अन्य कित्येक आजारांवर कडुलिंबाचा पाला व गूळ रामबाण आयुर्वेदिक उपाय मानला जातो.  कडुलिंब ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी - फंगल, अँटी - ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. धान्य साठवताना कडुल...