Posts

Showing posts from August, 2024

पणती जपून ठेवा, अंधार फार झाला

Image
थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला पणती जपून ठेवा, अंधार फार झाला अंधार हे अज्ञानाचे तर उजेड हे ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे प्रकाश हे तेज, शौर्य,वृद्धी, संकल्प, भरभराट याचे द्योतक आहे.म्हणूनच वाढदिवसाला या दिव्याप्रमाणे तेजस्वी हो असे म्हणत औक्षण करण्याची आमची परंपरा आहे.  निसर्गाशी एकरूप झालेल्या आमच्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान असायला हवा. आषाढात सर्व बाजूंनी मेघ दाटून आलेले, सर्वत्र काळोख पसरलेला, अशातच पावसाचा भडीमार, निसर्गाने सुद्धा रौद्र स्वरूप धारण केलेले... आयुष्य कसे कोंडून ठेवल्यासारखे जाणवते.  सगळे कसे कंटाळवाणे, खिन्न, उदास .... आरोग्याला सुद्धा त्रासदायक ठरणारे... अंगदुखी, ताप, खोकला असे संसर्गजन्य आजार याच दिवसात पसरतात. उजेडाच्या आणि उन्हाच्या अभावामुळे अनेक गोष्टी कुजतात त्याची दुर्गंधी, चिखल, सततच्या ओलसरपणामुळे नुसता वैताग येतो. कामात उत्साह राहत नाही. अति पावसामुळे पुर, लँड स्लाईड अशा घटना मन सुन्न करतात.  अशातच येणारी अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या... जणूकाही मनुष्याला भीती दाखवते... या काळात किमान विजेचे दिवे आहेत... परंतु पूर्वीच्या काळात वि...