Posts

Showing posts from August, 2021

गोपाळकाला.

Image
आज गोपाळकाला. कुणी  घरून पोहे आणले कुणी दुध, कुणी दही, कुणी शेंगदाणे, कुणी लाह्या आणल्या, कुणीतरी लोणचे आणले. कोणत्याही वस्तू ठरवून व प्रमाणात आणल्या नाहीत.   एका मोठ्या पातेल्यात हे सर्व घटक एकत्र केले. तयार झाला दहीकाला. कृष्णाला नैवेद्य दाखवला व काल्याचे प्रसादात रूपांतर झाले. सगळे पदार्थ एकमेकांत मिसळून गेले. कोणाचीही स्वतंत्र चव उरली नाही. सगळ्यांचा मिळून एक अनोखा स्वाद तयार झाला. हीच आहे आमची संस्कृती आणि हाच आहे आमचा संस्कार. असाच तयार झाला आहे आमचा समाज.  समानता म्हणजे कायद्याच्या दृष्टीने  सर्व स्त्री/पुरुष अथवा अनेक जातीपंथाचे  बांधव, सगळे एका पातळीवर आणि मग सगळ्यांना सारखी वागणूक आणि न्याय असा आहे. पण समानतेच्या पुढे जाऊन आम्हाला समरसता हवी आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या सुख - दु:खाशी एकरूप होऊन जाईल, एकमेकांवर कुटुंब भावनेने प्रेम करायला लागेल आणि मग खऱ्या अर्थाने एकजीव होईल.  सर्व संत, ईश्वराचे अवतार, ऋषी एका जाती पंथाचे  नव्हते त्यांना तशी बंधने घालणे  बरे नाही कारण त्यांनी अखिल मानव जातीच्या, अखिल विश्वाच्या उद्धराचे महान काम केले. त्य...

डोळे उघडवणारे संकट

Image
  डोळे उघडवणारे संकट संकट माणसाचे डोळे उघडते आणि शहाणे करून सोडते.... प्रचंड संहार करून महापूर जेव्हा ओसरतो तेंव्हा कधीकधी तो मूठभर माणिक मोती सुद्धा मागे ठेवतो. येणारे प्रत्येक संकट आयुष्य उध्वस्त करणारे व कितीही भीषण असले तरी जाताजाता मनुष्याला मौलिक तत्वज्ञान व बोध शिकवून जाते. यातूनच बोध घेऊन संकटाशी लढण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचे असते. कोरोना विरुद्ध लढताना काही गोष्टींचे महत्व आपल्या सगळ्यांनाच विशेषत्वाने कळून आले . १) एकलकोंडा असणे किती भयंकर आहे ते समजले. सामाजिक जीवनाचे महत्व कळले. जरी सामाजिक माध्यमांद्वारे संपर्क होत असला तरी माणसाने माणसाला प्रत्यक्ष भेटणे किती महत्वाचे आहे ते समजले. २)या संकटाचा सामना करताना स्वतःला  महासत्ता समजणारे देश सुद्धा मेटाकुटीला आले. त्यामुळे पैसा, सुबत्ता, तंत्रज्ञान, प्रगती या सर्व गोष्टी मानवी जीवनापेक्षा फार महत्वाच्या नाहीत हे सिद्ध झाले. ३) एरवी काही क्षण वाचविण्यासाठी धावपळ करणारे जग हतबल होऊन काही दिवस/महिने/वर्ष घरात बसले. एक रुपया सुद्धा नुकसान होऊ नये यासाठी दक्ष असलेल्या व्यापारी  जगाचे करोडो रुपयांचे नुकसान उघड्या डोळ्...

सुंदरता

Image
सुंदरता जरूर महत्त्व रखती है । लेकिन सुंदरता की व्याख्या अलग-अलग हो सकती है। कहीं-कहीं चट्टानों से बने हुए पर्वत सुंदर लगेंगे, कभी रेगिस्तान में सुंदरता दिखाई देगी, हरे भरे खेतों में सुंदरता है, विशाल जलाशय में भी सुंदरता है, नदी और समुद्र भी तो सुंदर ही दिखते हैं । सृष्टि में ईश्वर ने सब को सुंदर बनाया है लेकिन उस सुंदरता को पहचानने की दृष्टि सबको विकसित करनी चाहिए। बाहरी सुंदरता तो सब देखते हैं, जो अंतरंग में झांकें ऐसे कम मिलेंगे।  सुंदरता सृष्टि का स्वभाव है। सुंदरता ईश्वर की देन है। उसे पहचानने के लिए  विशाल हृदय भी मनुष्य के पास है । लेकिन स्वार्थ , मोह की माया ने मनुष्य को इतना विवश कर दिया है कि वह क्या सही और गया क्या गलत इसका फैसला ही कर नहीं पाता। अतः सज्जन संगति बहुत महत्व रखती है।  विशाल अंतःकरण और कोमल हृदय आदमिको अमीर बनाते है । जिसके मन में औरोंके प्रति संवेदना होती है वही मनुष्य आदमी कहने के लायक होता है।  प्रतिभा के धनी चाणक्य खुद रूपवान नहीं थे। चंद्रगुप्त मौर्य ने एक दिन मजाक में चाणक्य से कहा, ‘आचार्य जी, पूरी दुनिया जानती है कि आप कितने गुणवान ल...

मूळ स्वभाव कधीच बदलत नाही

Image
मनुष्य वाईट सवय सोडत नाही म्हणून दासबोधात समर्थ म्हणतात "मनुष्या पेक्षा पाषाण गोटा भला ". दगडा पासून मूर्ती बनवताना दगडाचा टवका उडतो पण तो पुन्हा दगडाला चिकटत नाही. परंतु मनुष्याने कितीही काढून टाकायचा असे ठरवले तरी दुर्गुण पुन्हा चिकटतो आणि मनुष्य पुन्हा मूळ पदावर येतो . याचे कारण स्वभावो दुरतिक्रम: , म्हणजेच मूळ स्वभाव बदलत नाही.  याचे वर्णन करण्यापेक्षा एक खूप छान गोष्ट ऐका.एक ऋषी होते. एकदा स्नानासाठी ते नदीवर गेले होते. तेव्हा एक ससाणा एका उंदरीच्या मागे लागला होता. ती उंदरी ऋषींच्या ओंजळीत आश्रयासाठी आली.  ऋषी मोठे विद्वान होते. त्यांनी तपू सामर्थ्याच्या जोरावर तिचे एका सुंदर कन्येत रूपांतर केले. ऋषींना मूलबाळ नव्हते. त्यांनी त्या कन्येला घरी नेली व स्वतःच्या आपल्याप्रमाणे सांभाळ केला.  मुलगी उपवर झाली. तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली. पण माझा जावई सर्वश्रेष्ठ असावा असे ऋषींना वाटत होते. त्यांनी सूर्याला आवाहन केले व माझ्या मुलीशी लग्न कर असे सांगितले.  सूर्य हो म्हणाला पण मुलगी म्हणाली मी याच्या उष्णतेने करपून जाईन मला हा नवरा नको.  मग ऋषी म्हणाले सुर्या प...

स्नेह सूत्र हे करी धरावे

Image
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपणा भारतीयांचे सर्व सण व उत्सव हे केवळ कल्पनांवर आधारित नसून त्यापाठीमागे सामाजिक बांधिलकी व सुखी जीवनाचे खूप मोठे तत्त्वज्ञान याचा पाया आहे. रेशमाचा केवळ एकच धागा भावा-बहिणीच्या पवित्र नात्यांमधला गोडवा अधिकच वृद्धिंगत करतो. भारतीय संस्कृतीला एकमेकांमधील नाती ही साखळदंडाप्रमाणे पाश वाटत नाहीत तर व्यक्ती व्यक्तींमधील ही नाती ही एक पवित्र बंधन आहे.  आम्ही सारे बांधव आहोत.... असे आपण प्रतिज्ञेत म्हणतोच. यानुसार आपण सारे बंधुत्वाच्या एका सोनेरी धाग्यात बांधले गेलेलो आहोत.  म्हणूनच आज एक राखी आपल्यासाठी. भारत मातेचे रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य नाही, आपल्याला भारत माता विश्वगुरू पदी विराजमान झालेली बघायची आहे. यासाठी एकमेकांना बळ देणे,  देशाची एकता , अखंडता दृढ व्हावी व आपल्या महान परंपरा व संस्कृती यांचे जतन व्हावे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. आपणही हा संदेश इतरांना पाठवून यांची एक साखळी तयार करूया.  मला खूप आवडलेले हे संघ गीत आपल्याला सुद्धा नक्कीच आवडेल स्नेहसूत्र हे करी धरावे संघटनेला ह्रदय वहावे॥ध...

मूल्य आणि किंमत

Image
  मूल्य आणि किंमत एकदा एक गुरू आपल्या शिष्यांना मूल्य आणि किंमत यातील फरक समजावून देत होते. गुरुजी म्हणाले ज्या वस्तूंची किंमत अत्यल्प असते त्या वस्तूंचे मूल्य मात्र सर्वात जास्त असू शकते असे एखादे उदाहरण द्या. शिष्यांना उत्तर सुचले नाही. गुरु म्हणाले बाळांनो, मिठाचे उदाहरण घ्या सर्व जेवणाच्या पदार्थात सर्वात स्वस्त किमतीचा असणारा हा पदार्थ. परंतु इतर एखादा पदार्थ विसरला तर चालते परंतु मीठ विसरले तर चालत नाही. त्यामुळे मिठाची किंमत अतिशय कमी असून देखील जेवणात मिठाचे मूल्य खूप आहे. नंतर गुरुजींनी शिष्यांना दुसरा प्रश्न विचारला, अशी एखादी गोष्ट सांगा की ज्याची किंमत अतिशय कमी परंतु उपद्रव मूल्य मात्र प्रचंड मोठे असते. या प्रश्नामुळे शिष्य चांगलेच गोंधळले. गुरुजी म्हणाले गोंधळून जाऊ नका . मागच्या उदाहरणातील मीठा विषयी विचार करा. या मीठाची किंमत कमी आहे हे तर मान्य आहे परंतु एक चिमुटभर मीठ दुधात पडल्यावर सारे दूध नासवते.शिष्य आवाक होऊन ऐकत होते . यावर गुरुजींनी विचारले आता सांगा या उदाहरणावरून काय बोध घ्यावा ?  "वस्तूंना केवळ त्यांच्या किमतीवरून न ओळखता त्यांचे मूल्य व उपद्रव मू...

समाज माध्यमांचा अतिरेकी वापर

Image
    दवंडी पिटण्याचे आत्याधूनिक साधन म्हणजे समाजमाध्यमे असे म्हणल तर अतिशयोक्ती न ठरावी. माणूस समाज माध्यमांचा गुलाम झालाय का....? ही माध्यम उपलब्ध झाली आणि अभिव्यक्तीला  उधाण आले. लोकांना व्यक्त होण्याची विचार मांडण्याची साधने उपलब्ध झाली. ही अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. पण ऐकणार्‍याच्याही काही क्षमता असतात. तो किती जणांचं आणि काय काय म्हणून ऐकेल ? मला समजलेली बातमी कधी एकदा इतरांना सांगू असं माणसाला होतं. किंबहुना प्रत्येक बातमी माझ्यामुळेच इतरांना कळावी असा त्याचा अट्टाहास असतो.  त्यामुळे पेपरात आलेली हेडलाईन न्यूज सुद्धा तो फोटो काढून सामाजिक माध्यमांवर टाकत राहतो. इतर लोकही पेपर वाचतात, टीव्ही बघतात हे त्याला पटतच नाही. प्रसिद्धीची इच्छा सर्वांच्यात नैसर्गिकच असते. पण नंतर नंतर या इच्छेचे रूपांतर हव्यास व हाव यात होते. प्रसिद्धी मोजण्याचे परिमाण समाज माध्यमांनी निर्माण करून दिले आहे त्याला लाईक असे म्हणतात. मग या लाईक्स मिळवण्यासाठी धडपड चालू होते.  केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बरेचदा आला मेसेज त्याची सत्यता पडताळून न बघता पुढे पाठवला जातो. यामुळे होणा...

अती तिथे माती ...

Image
अती तेथे माती   एक भिकारी देवाची भरपूर प्रार्थना करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.  भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला . नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मनासारिखे दु:ख मोठे      विपरीत परिस्थितीला तोंड देत मनुष्य झगडत यश मिळवतो. पण एकदा का लय पकडली की त्या लयीमध्ये तो स्वतःचे स्वत्व सुद्...

मुखी घास घेता करावा विचार

Image
अन्नात् भवती भूतानी ... भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायातील हे वचन खरोखरीच विचार करायला भाग पाडणारे आहे. अन्न हे केवळ पोट भरायचे साधन नसून तो शरीरासाठी कार्यशक्ती पुरवणारा एक ऊर्जास्त्रोत आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म काहीही खाताना हा विचार ही जाणीव सतत मनात असायला हवी. परंतु अन्नामुळे ऊर्जा निर्माण होत असली तरी ती ऊर्जा सकारात्मक असावी आणि सकारात्मक कार्यासाठी वापरली जावी यासाठी कोणतीही गोष्ट खाताना मनामध्ये असलेले विचार फार महत्त्वाचे असतात. म्हणूनच जेवताना शांतता असावी, कुटुंबातील सर्वांनी  शक्यतो एकत्र जेवावे असा संकेत आहे. टीव्ही  बघता बघता लोक जेवण करतात. बरेच वेळा आपण काय खातो आणि आपली भूक किती आहे याचीही जाण त्यामुळे राहत नाही. सहाजिकच अपचन ऍसिडिटी असे विकार जडतात. याला शरीरशास्त्राची सुद्धा जोड आहे कारण शांतपणे सेवन केलेल्या अन्नाचे चर्वण व्यवस्थित होऊन चयापचय व्यवस्थित होते. परिणामी ऊर्जानिर्मिती प्रक्रिया परिणामकारक ठरते. अर्पण, समर्पण आणि त्याग म्हणजे भारतीय संस्कृती. एकेक छोटी छोटी गोष्ट अर्पण करता करता समर्पणाची सवय जडते. आणि समर्पण वृत्तीमुळे गर्व अहंकार तर दूर...

लाजबाब क्या भात है...

Image
  बायकांना स्वतःचं सुख समजतच नाही हेच खरे.  रोज रोज सगळा स्वयंपाक कशाला करायचा ?  फक्त भात लावत जावा असे सांगून सांगून मी थकलो आहे.  खरं तर भाताशी एकनिष्ठ असणारे आम्ही केवळ भातावर आयुष्यभर सुखी राहू शकतो. जेवताना ताटात मध्ये भात असलाच पाहिजे.  दक्षिणेतल्या सारखा भाताचा डोंगर नसला तरी निदान नजरेला कंजूशी जाणवायला नको ईतका मात्र हवा.  मूद, लिंबाएवढा भात असे शब्दप्रयोग आणि औपचारिकता भातप्रेमींच्या शब्दकोशात नाहीच मुळी.भाताबरोबर  कोणाचीही युती अगदी सहजपणे होते.. म्हणजे वरण, आमटी, पातळ भाजी, टॉमेटो सार, उडदाचे घुटे, कढी, ताक, दूध, दही कशाचीही.  याबरोबर पान शोभेला कितीही जण असले तरी भाताचे स्थान हे मुख्यच राहते त्यामुळे भातावर काहीच परिणाम होत नाही. पापड, कुरडई, तळण, विविध  प्रकारच्या सुक्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, सलाड असे अनेकजण जणू काही आपल्या उपस्थितीमुळे त्या परब्रह्माची (भाताची) आराधना करतानाच त्याच्याशी आपली जवळीक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा भाऊ गर्दीला कंटाळून हे परब्रह्म काही वेळा एकटेपणा पसंत करते आणि केवळ एक दोन जणांना स...

देऊळ बंद

Image
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे वातावरण थोडे निवळले होते. जेवण झाल्यावर शतपावली करायला बाहेर पडलो. शेजारच्याच एका मंदिरासमोर. अडखळलो. रस्त्यातच चप्पल काढली आणि बंद दरवाजा बाहेरूनच देवाला नमस्कार केला. तेवढ्यात कोणीतरी हसल्याचा आवाज आला. आसपास पहिले तर कोणीही नव्हते मला वाटले भासच झाला असेल मी पुन्हा परत येण्यासाठी वळलो. पुन्हा आवाज आला,"काय सर, कमाल आहे नाही कधी कुणाचे कसे दिवस येतील सांगता येत नाही". मी थोडे भांबावून गेलो. "अहो सर मीच बोलतोय". बंद दरवाजा आज चक्क माझ्याशी बोलत होता. "म्हणजे काय मी समजलं नाही" , मी म्हणालो. "अहो, तुम्ही ज्याला देव समजता त्याला मी बंद करून ठेवलं आणि त्याचे भक्त समजणारे लोक मात्र मलाच नमस्कार करतात आहे का नाही मजा". "हो खर आहे", मी नकळत म्हणून गेलो. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. या दरवाजाची फुशारकी जरा जास्तच धाडसाची जाणवत होती. साहेबाच्या केबिनच्या बाहेर बसणाऱ्या शिपायाची मिजास जास्त सहन करावी लागते. त्याचप्रमाणे त्या दरवाजाची बडबड मी ऐकून घेत होतो. देव भक्तांची ताटातूट करण्याचे काम करणारा तो जरा जास्त...