समाज माध्यमांचा अतिरेकी वापर
माणूस समाज माध्यमांचा गुलाम झालाय का....?
ही माध्यम उपलब्ध झाली आणि अभिव्यक्तीला उधाण आले. लोकांना व्यक्त होण्याची विचार मांडण्याची साधने उपलब्ध झाली. ही अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. पण ऐकणार्याच्याही काही क्षमता असतात. तो किती जणांचं आणि काय काय म्हणून ऐकेल ? मला समजलेली बातमी कधी एकदा इतरांना सांगू असं माणसाला होतं. किंबहुना प्रत्येक बातमी माझ्यामुळेच इतरांना कळावी असा त्याचा अट्टाहास असतो.
त्यामुळे पेपरात आलेली हेडलाईन न्यूज सुद्धा तो फोटो काढून सामाजिक माध्यमांवर टाकत राहतो. इतर लोकही पेपर वाचतात, टीव्ही बघतात हे त्याला पटतच नाही.
प्रसिद्धीची इच्छा सर्वांच्यात नैसर्गिकच असते. पण नंतर नंतर या इच्छेचे रूपांतर हव्यास व हाव यात होते. प्रसिद्धी मोजण्याचे परिमाण समाज माध्यमांनी निर्माण करून दिले आहे त्याला लाईक असे म्हणतात. मग या लाईक्स मिळवण्यासाठी धडपड चालू होते.
केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बरेचदा आला मेसेज त्याची सत्यता पडताळून न बघता पुढे पाठवला जातो. यामुळे होणाऱ्या सामाजिक नुकसानीची त्या व्यक्तीस जाणीव नसते. किंवा काही वेळा आला मेसेज न वाचताच त्याला दिल्या जातात हेही तेवढेच चुकीचे आहे.
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काय होऊ शकते याची कल्पनाही करवत नाही. बरेच वेळा इतरांचा संदेश कॉपी करून त्याखालचे नाव बदलून स्वतःचे नाव टाकून फॉरवर्ड करणारे काही महाभाग धन्य आहेत. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्याला कृपया हा संदेश नावासह फॉरवर्ड करावा अशी तळटीप टाकावी लागते.
वस्तुतः बहुतांशी समाज हा जाणीव असलेला आहे. पण समाज माध्यमाचा उपयोग कसा करावा याची माहिती नसते
संवाद साधताना केवळ मीच बोलत राहणार इतरांचे ऐकणार नाही असे झाले तर तो संवाद एकतर्फी होतो. बरेच वेळा दिवसभरात भरमसाठ संदेश म्हणजेच मेसेज टाकणाऱ्यांचे बाबतीत देखील असेच होते. हळूहळू लोक त्यांना कंटाळतात. धडाधड येणाऱ्या संदेशामुळे लोक वैतागतात. त्यामुळे बरेचदा संदेश बघणे देखील टाळतात. या अतिरेकामुळे योग्य व चांगले संदेश देखील लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत .
प्रत्येकाच्या काही आवडी-निवडी असतात, प्रत्येकाचे काही ठाम विचार असतात. आणि ते असायला हवेत. प्रत्येकाच्या अभ्यासाचा चिंतनाचा भाग आवडीचे विषय वेगवेगळे असतात. त्या त्या विषयात त्यांनी आपली मते नोंदवणे अपेक्षितच आहे. पण बरेच वेळा ज्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही तोही बिनधास्तपणे व ठामपणे आपली मते मांडत असतो.
आपले घर ,आपले कुटुंब, त्यातील सदस्य अशा अनेक खाजगी व वैयक्तिक गोष्टी असतात. आपले स्नेही मित्र आपल्या परिवाराचा एक भाग असतो. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात त्यात समाविष्ट करून घेणे हेही कळत नाही. पण आपल्या खाजगी गोष्टी विनाकारण सर्वांना सांगून त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नाही. आपण कुठे सहलीला गेलो की जणू काही एखादी मोठी लढाई जिंकली आहे या आविर्भावात पाच-पन्नास फोटो समाज माध्यमांवर टाकणी किती योग्य आहे ? आमच्यात आज जेवायला काय केले आहे याचीही माहिती सगळ्यांना व्हायलाच हवी का ? "आत्ताच जेवलो" असे संदेश देखील बघायला मिळाले तर नवल वाटायला नको. अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आजकाल पती-पत्नींना, आई - मुलाला एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा या समाज माध्यमांद्वारे द्याव्या लागतात. काही ठराविक मर्यादेपर्यंत हे ठीक देखील आहे. पण या मर्यादेनंतर या नाजूक नात्यांचे बाजारीकरण तर होत नाही ना ? असा प्रश्न पडतो. पण ही मर्यादा ठरवणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे.
अशा खाजगी गोष्टी समाज माध्यमांवर टाकल्यामुळे अनेक अनपेक्षित गोष्टी देखील घडतात. "Enjoying Mahabaleshwar Trip" असे स्टेटस ठेवणे, सहलीचे फोटो लोड करणे व सहलीचा अपलोड देत राहणे यामुळे भुरटे चोर, घरावर पाळत ठेवणारे यांना आयतीच माहिती उपलब्ध होते.
सुटसुटीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असणारा संदेश लोकांना भावतो. सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या सोयीमुळे शुभेच्छांचा सुळसुळाट देखील तेवढाच वाढला आहे विशेष करून वेगवेगळ्या ग्रुपवर सदस्यांची संख्या केव्हा मोठी असते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा आणि त्यामुळे होणारी मोबाईलचा ध्वनी व कंपन यामुळे होणाऱ्या त्रासामुळे फोन सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. त्यामुळेच बरेच वेळा आलेले महत्त्वाचे फोनच कळत नाहीत.
अनेक वेळा लोक एखाद्या ग्रुपवर वैयक्तिक गप्पा मारत बसतात त्याचा इतर सदस्यांना त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक चॅटिंग च्या वेळी व्यक्तिगत अकाउंट वापरले तर हा त्रास टाळता येतो. मासे जसे ठराविक काळानंतर श्वास घ्यायला पाण्यावर येतात तसेच काही जणांना कुतूहलापोटी पाच मिनिट झाले की फोन वर काढून बघायची सवय लागते. यामुळे प्रसंगी नवरा-बायको व कौटुंबिक सदस्यांमध्ये भांडणे झाल्याचे देखील ऐकिवात येते. लक्ष फोन मध्ये असल्यामुळे समोरची व्यक्ती काय म्हणते हे नीट समजत नाही त्यामुळे बरेच वेळा गैरसमजाचे वातावरण निर्माण होते.
या गोष्टी कोणा एकाच्या बाबतीत घडतात असे नक्कीच नाही. प्रत्येक जणांच्या बाबतीतच कमी-अधिक प्रमाणात असे घडते मी तुम्ही आपण सगळेच या गोष्टींची शिकार झालेले आहोत. कुटुंबातील सदस्य, घरी आलेले पाहुणे, आपल्याशी चर्चा करणारे मित्र यांच्याशी बोलताना फोन बाजूला ठेवावा कारण मुळे त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होते व साहजिकच त्यांचा अपमान होतो.
यासाठी अनेक छोटे-छोटे उपाय करून बघता येतील. कामाव्यतिरिक्त मोबाईल डेटा बंद करून ठेवणे ठराविक वेळ चालू ठेवून, ठराविक वेळेत आलेले सर्व संदेश बघणे व त्यांना उत्तर देणे. अनावश्यक व कमी महत्त्वाचे संदेश एकमेकांना पाठवणे बंद करणे. अगदी महत्त्वाचे काम असेल तेव्हा प्रत्यक्ष फोनवर चर्चा करणे किंवा प्रत्यक्ष संपर्क करणे. शक्यतो फोन शरीरापासून दूर ठेवणे, विशेषकरून झोपताना.
कुटुंबातील सदस्यांनी किमान एक वेळचे भोजन एकत्र करणे. त्यावेळी टीव्ही सुरू असायला नको.
मानसिक शांततेसाठी आठवड्यातून एक दिवस आपण फोन बंद ठेवू शकतो. महत्वाचे निरोप मिळावेत म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सोयीनुसार हा दिवस ठरवता येईल. किमान भेटू शकतील अशा मित्र व परिचितांनी आठवड्यातून एक वेळा दोन तास गप्पा मारण्यासाठी एकत्र बसल्यास प्रत्यक्ष संपर्क वाढून मोबाईलचे व्यसन कमी करण्यास मदत होईल. वाचन, लेखन, कला साहित्य, वादन ,गायन विविध छंदांमध्ये स्वतःला झोकून घेतल्यास मोबाईलचे व्यसन कमी होईल.
"अति तिथे माती" ही एक साधी सुटसुटीत म्हण मराठीत आहे. किती पळायचे यापेक्षा कुठे थांबायचे हे ज्याला कळते तोच यशस्वी होतो. तंत्रज्ञान हे एक भूत आहे. ते आपल्याला वश झाले आहे. पण मनुष्य त्याचा गुलाम होतो का मनुष्य त्याला गुलाम करून घेतो यावर त्याची परिणामकारकता अवलंबून आहे.
श्री. गुंजन हरी देव सातारा
9890590495
माणूस समाज माध्यमांचा गुलाम झालाय का....?
ही माध्यम उपलब्ध झाली आणि अभिव्यक्तीला उधाण आले. लोकांना व्यक्त होण्याची विचार मांडण्याची साधने उपलब्ध झाली. ही अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. पण ऐकणार्याच्याही काही क्षमता असतात. तो किती जणांचं आणि काय काय म्हणून ऐकेल ? मला समजलेली बातमी कधी एकदा इतरांना सांगू असं माणसाला होतं. किंबहुना प्रत्येक बातमी माझ्यामुळेच इतरांना कळावी असा त्याचा कयास होतो. त्यामुळे पेपरात आलेली हेडलाईन न्यूज सुद्धा तो फोटो काढून सामाजिक माध्यमांवर टाकत राहतो. इतर लोकही पेपर वाचतात, टीव्ही बघतात हे त्याला पटतच नाही.
प्रसिद्धीची इच्छा सर्वांच्यात नैसर्गिकच असते. पण नंतर नंतर या इच्छेचे रूपांतर हव्यास व हाव यात होते. प्रसिद्धी मोजण्याचे परिमाण समाज माध्यमांनी निर्माण करून दिले आहे त्याला लाईक असे म्हणतात. मग या लाईक्स मिळवण्यासाठी धडपड चालू होते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बरेचदा आला मेसेज त्याची सत्यता पडताळून न बघता पुढे पाठवला जातो. यामुळे होणाऱ्या सामाजिक नुकसानीची त्या व्यक्तीस जाणीव नसते. किंवा काही वेळा आला मेसेज न वाचताच त्याला दिल्या जातात हेही तेवढेच चुकीचे आहे.
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काय होऊ शकते याची कल्पनाही करवत नाही. बरेच वेळा इतरांचा संदेश कॉपी करून त्याखालचे नाव बदलून स्वतःचे नाव टाकून फॉरवर्ड करणारे काही महाभाग धन्य आहेत. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या ला कृपया हा संदेश नावासह फॉरवर्ड करावा अशी तळटीप टाकावी लागते.
वस्तुतः बहुतांशी समाज हा जाणीव असलेला आहे. पण समाज माध्यमाचा उपयोग कसा करावा याची माहिती नसते
संवाद साधताना केवळ मीच बोलत राहणार इतरांचे ऐकणार नाही असे झाले तर तो संवाद एकतर्फी होतो. बरेच वेळा दिवसभरात भरमसाठ संदेश म्हणजेच मेसेज टाकणाऱ्यांचे बाबतीत देखील असेच होते. हळूहळू लोक त्यांना कंटाळतात. धडाधड येणाऱ्या संदेशामुळे लोक वैतागतात. त्यामुळे बरेचदा संदेश बघणे देखील टाळतात. या अतिरेकामुळे योग्य व चांगले संदेश देखील लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत .
प्रत्येकाच्या काही आवडी-निवडी असतात, प्रत्येकाचे काही ठाम विचार असतात. आणि ते असायला हवेत. प्रत्येकाच्या अभ्यासाचा चिंतनाचा भाग आवडीचे विषय वेगवेगळे असतात. त्या त्या विषयात त्यांनी आपली मते नोंदवणे अपेक्षितच आहे. पण बरेच वेळा ज्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही तोही बिनधास्तपणे व ठामपणे आपली मते मांडत असतो.
आपले घर ,आपले कुटुंब, त्यातील सदस्य अशा अनेक खाजगी व वैयक्तिक गोष्टी असतात. आपले स्नेही मित्र आपल्या परिवाराचा एक भाग असतो. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात त्यात समाविष्ट करून घेणे हेही कळत नाही. पण आपल्या खाजगी गोष्टी विनाकारण सर्वांना सांगून त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नाही. आपण कुठे सहलीला गेलो की जणू काही एखादी मोठी लढाई जिंकली आहे या आविर्भावात पाच-पन्नास फोटो समाज माध्यमांवर टाकणी किती योग्य आहे ? आमच्यात आज जेवायला काय केले आहे याचीही माहिती सगळ्यांना व्हायलाच हवी का ? "आत्ताच जेवलो" असे संदेश देखील बघायला मिळाले तर नवल वाटायला नको. अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आजकाल पती-पत्नींना, आई - मुलाला एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा या समाज माध्यमांद्वारे द्याव्या लागतात. काही ठराविक मर्यादेपर्यंत हे ठीक देखील आहे. पण या मर्यादेनंतर या नाजूक नात्यांचे बाजारीकरण तर होत नाही ना ? असा प्रश्न पडतो. पण ही मर्यादा ठरवणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे.
अशा खाजगी गोष्टी समाज माध्यमांवर टाकल्यामुळे अनेक अनपेक्षित गोष्टी देखील घडतात. "Enjoying Mahabaleshwar Trip" असे स्टेटस ठेवणे, सहलीचे फोटो लोड करणे व सहलीचा अपलोड देत राहणे यामुळे भुरटे चोर, घरावर पाळत ठेवणारे यांना आयतीच माहिती उपलब्ध होते.
सुटसुटीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असणारा संदेश लोकांना भावतो. सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या सोयीमुळे शुभेच्छांचा सुळसुळाट देखील तेवढाच वाढला आहे विशेष करून वेगवेगळ्या ग्रुपवर सदस्यांची संख्या केव्हा मोठी असते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा आणि त्यामुळे होणारी मोबाईलचा ध्वनी व कंपन यामुळे होणाऱ्या त्रासामुळे फोन सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. त्यामुळेच बरेच वेळा आलेले महत्त्वाचे फोनच कळत नाहीत.
अनेक वेळा लोक एखाद्या ग्रुपवर वैयक्तिक गप्पा मारत बसतात त्याचा इतर सदस्यांना त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक चॅटिंग च्या वेळी व्यक्तिगत अकाउंट वापरले तर हा त्रास टाळता येतो. मासे जसे ठराविक काळानंतर श्वास घ्यायला पाण्यावर येतात तसेच काही जणांना कुतूहलापोटी पाच मिनिट झाले की फोन वर काढून बघायची सवय लागते. यामुळे प्रसंगी नवरा-बायको व कौटुंबिक सदस्यांमध्ये भांडणे झाल्याचे देखील ऐकिवात येते. लक्ष फोन मध्ये असल्यामुळे समोरची व्यक्ती काय म्हणते हे नीट समजत नाही त्यामुळे बरेच वेळा गैरसमजाचे वातावरण निर्माण होते.
या गोष्टी कोणा एकाच्या बाबतीत घडतात असे नक्कीच नाही. प्रत्येक जणांच्या बाबतीतच कमी-अधिक प्रमाणात असे घडते मी तुम्ही आपण सगळेच या गोष्टींची शिकार झालेले आहोत. कुटुंबातील सदस्य, घरी आलेले पाहुणे, आपल्याशी चर्चा करणारे मित्र यांच्याशी बोलताना फोन बाजूला ठेवावा कारण मुळे त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होते व साहजिकच त्यांचा अपमान होतो.
यासाठी अनेक छोटे-छोटे उपाय करून बघता येतील. कामाव्यतिरिक्त मोबाईल डेटा बंद करून ठेवणे ठराविक वेळ चालू ठेवून, ठराविक वेळेत आलेले सर्व संदेश बघणे व त्यांना उत्तर देणे. अनावश्यक व कमी महत्त्वाचे संदेश एकमेकांना पाठवणे बंद करणे. अगदी महत्त्वाचे काम असेल तेव्हा प्रत्यक्ष फोनवर चर्चा करणे किंवा प्रत्यक्ष संपर्क करणे. शक्यतो फोन शरीरापासून दूर ठेवणे, विशेषकरून झोपताना.
कुटुंबातील सदस्यांनी किमान एक वेळचे भोजन एकत्र करणे. त्यावेळी टीव्ही सुरू असायला नको.
मानसिक शांततेसाठी आठवड्यातून एक दिवस आपण फोन बंद ठेवू शकतो. महत्वाचे निरोप मिळावेत म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सोयीनुसार हा दिवस ठरवता येईल. किमान भेटू शकतील अशा मित्र व परिचितांनी आठवड्यातून एक वेळा दोन तास गप्पा मारण्यासाठी एकत्र बसल्यास प्रत्यक्ष संपर्क वाढून मोबाईलचे व्यसन कमी करण्यास मदत होईल. वाचन, लेखन, कला साहित्य, वादन ,गायन विविध छंदांमध्ये स्वतःला झोकून घेतल्यास मोबाईलचे व्यसन कमी होईल.
"अति तिथे माती" ही एक साधी सुटसुटीत म्हण मराठीत आहे. किती पळायचे यापेक्षा कुठे थांबायचे हे ज्याला कळते तोच यशस्वी होतो. तंत्रज्ञान हे एक भूत आहे. ते आपल्याला वश झाले आहे. पण मनुष्य त्याचा गुलाम होतो का मनुष्य त्याला गुलाम करून घेतो यावर त्याची परिणामकारकता अवलंबून आहे.
श्री. गुंजन हरी देव सातारा
9890590495

Comments
Post a Comment