Posts

Showing posts from June, 2025

आईचा हात....

Image
शनिवारचा दिवस होता. मारुतीरायांसाठी आणि शनीसाठी रुईची हिरवीगार विस्तीर्ण पाने आणली. ईश्वर म्हणजे कलेचे अधिष्ठान. ईश्वराला भाव जास्त प्रिय असतो. रुईच्या पानांचा हार केला. आईला शनीला जाऊन येतो असे सांगितले. तेवढ्यात हातात सुट्या पैशाचा डबा घेऊन आई आली. संध्याकाळच्या वेळी पावसामुळे अंधारून आले होते. आईने डब्यात हात घातला आणि हाताला आलेले एक नाणे काढून मला दिले. मी ते तसेच खिशात ठेवले. मारुतीरायांना, शनीला हार घातला प्रदक्षिणा घातली तेवढ्यात आईने पैसे ठेवायला सांगितले होते ते आठवले. खिशातून काढलेल्या नाण्यावर नजर गेली तेव्हा समजले तो वीस रुपयाचा ठोकळा होता. नजरेसमोर असलेला देव वेगळा होता आणि हृदयात साठून असलेल्या देवाच्या विचारांनी मनात काहूर निर्माण झाले. *"मित्रांनो, हातचं राखून न ठेवणारा हात केवळ आईचाच असू शकतो.* आईचा हात आहेच असा. देताना कधीही कमी पडणार नाही. तिने सहज हाताने देवासाठी काढून दिलेली नाणेसुद्धा खणखणीत निघाले. तो हात जादूचा आहे. त्या हाताला हातचे राखून न ठेवता भरभरून देणे माहित आहे. दुसऱ्याला दिल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही हे याच हाताने आम्हाला शिकवले. उत्तम हेच द...