Posts

Showing posts from May, 2022

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Image
 अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाज माध्यम हे केवळ माध्यम आहे. तो एखाद्या समस्येवरचा परिपूर्ण तोडगा असू शकत नाही. समाज माध्यम ही व्यक्त होण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना शब्द, संस्कार, सभ्यता, शिष्टाचार याच्या मर्यादांचे पालन व्हायलाच हवे. राजकीय हेवेदावे असूही शकतात. पण संस्काराची किमान पातळी राखायला हवी. एखादा राजकीय किंवा ईतर विचार सगळ्यांना नेहमीच पटणारा असतो असेही नाही. त्यातही काही गैर नाही. विरोध होतो, होणार पण त्याला द्वेषाची किनार असता कामा नये. शेवटी आम्ही सारे भारतीय आहोत ही जाणीव जपायला हवी. राजकीय विरोधाच्या परिसीमा गाठल्या गेल्या तर मतदान नावाचे ताकतवान शस्त्र लोकशाहीने प्रत्येकालाच बहाल केलेले आहे. एका बोटामध्ये, बटन दाबून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची ताकत आहे. समाज माध्यमे वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. राष्ट्र घडवण्यासाठी, समाज मनामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या माध्यमांचे महत्त्वाचे स्थान आहे. स्वतंत्रपणे सत्याचे सामर्थ्य सर्वांच्या समोर साकारण्याची सकारात्मक सोय समाजमाध्यमे सहजतेने उपलब्ध करून देतात.  जाणीव, सजगता ज...