आरोग्यदायी कडुलिंब लोक आवडीने खातील

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन करण्यांचं विशेष महत्त्व आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण चवीने खातील अशी कडुलिंबाची गोळी एकदा करून तर पहा.

भाजलेले शेंगदाणे, कडुलिंबाची कोवळी पाने, चवीनुसार मिरची, जिरे,  मीठ आणि गूळ मिक्सर मध्ये अथवा कुटून एकजीव करून त्याच्या वाटाण्याएवढया गोळ्या तयार कराव्यात. मीठ आणि मिरची चवीनुसार घालावी. गोळी चघळून खावी. तोंडाला चव येते. सर्वजण आवडीने खातात.उत्तम आरोग्यासाठी कडू ,आंबट, तिखट ,गोड, खारट ,तुरट या सर्व रसांचे संतुलन अतिशय महत्त्वाचे आहे.


गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबासह अन्य पदार्थ एकत्रित करून प्रसाद तयार केला जातो. उन्हाळा बाधू नये तसंच आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कडुलिंबाची पाने व गूळ याचे एकत्रीत सेवन फायदेकारक आहे.

पित्त, भूक न लागणे, पोटदुखी, त्वचाविकार, तोंडाचे विकार यासासह अन्य कित्येक आजारांवर कडुलिंबाचा पाला व गूळ रामबाण आयुर्वेदिक उपाय मानला जातो.

 कडुलिंब ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी - फंगल, अँटी - ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. धान्य साठवताना कडुलिंबाचा पाला वापरला जातो. कडुलिंबामुळे हवा शुद्ध राहते.

रक्तदाब : उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते.

मधुमेह : कडुलिंबाच्या कडवटपणामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते. पण मधुमेहींनी कडुलिंबाच्या पाल्याने सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त चांगले. 

तोंडाला येणारी दुर्गंधी, दात किडणे, हिरड्यांचे विकार अशा समस्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो.

केस व त्वचेचं आरोग्य निरोगी राहण्यासाठीही कडुलिंब वापरतात. कडुलिंब आंघोळीच्या पाण्यात काही काळ बुडवून त्या पाण्याने  स्नान करणे हा एक उत्तम अनुभव आहे. यासाठीच साबण, सौंदर्य प्रसाधने अशा अनेक उत्पादनात कडुलिंबाचा उपयोग केला जातो.



प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचा गोड आनंद साजरा करताना प्रकृतीसाठी उपयुक्त असा कडू कडूलिंब सेवन करायला सांगणारी आमची परंपरा धन्य आहे. 

भारत माता की जय

श्रीराम जय राम जय जय राम

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी