स्नेह सूत्र हे करी धरावे
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
आपणा भारतीयांचे सर्व सण व उत्सव हे केवळ कल्पनांवर आधारित नसून त्यापाठीमागे सामाजिक बांधिलकी व सुखी जीवनाचे खूप मोठे तत्त्वज्ञान याचा पाया आहे.
रेशमाचा केवळ एकच धागा भावा-बहिणीच्या पवित्र नात्यांमधला गोडवा अधिकच वृद्धिंगत करतो. भारतीय संस्कृतीला एकमेकांमधील नाती ही साखळदंडाप्रमाणे पाश वाटत नाहीत तर व्यक्ती व्यक्तींमधील ही नाती ही एक पवित्र बंधन आहे.
आम्ही सारे बांधव आहोत.... असे आपण प्रतिज्ञेत म्हणतोच. यानुसार आपण सारे बंधुत्वाच्या एका सोनेरी धाग्यात बांधले गेलेलो आहोत.
म्हणूनच आज एक राखी आपल्यासाठी. भारत मातेचे रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य नाही, आपल्याला भारत माता विश्वगुरू पदी विराजमान झालेली बघायची आहे. यासाठी एकमेकांना बळ देणे, देशाची एकता , अखंडता दृढ व्हावी व आपल्या महान परंपरा व संस्कृती यांचे जतन व्हावे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. आपणही हा संदेश इतरांना पाठवून यांची एक साखळी तयार करूया.
मला खूप आवडलेले हे संघ गीत आपल्याला सुद्धा नक्कीच आवडेल
स्नेहसूत्र हे करी धरावे
संघटनेला ह्रदय वहावे॥धृ॥
बंधुत्वाचे विस्मृत नाते
ह्रदयी अमुच्या आज जागते
तेच निरंतर जगवायाते
श्रध्देचे वरदान मिळावे॥१॥
मणिबंधावर जर हे कंकण
तर ह्रदयांतिल उजळे कणकण
नैराश्याचा तिमिर झुगारुन्
तेजोमय मनमंदिर व्हावे॥२॥
अखंड निष्ठा दृढ अनुशासन
प्रलब संयमित घडविल जीवन
सहज कुठेतरि घडता स्पंदन
घरोघरी स्वर तेच उठावे॥३॥
सुखदुःखाची समान जाणिव
या भूमीचे घडविल वैभव
वीरव्रताचा करण्या आठव
रक्षाबंधन अमर रहावे॥४॥
उधाण आलेल्या समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात कोकणी बांधव उत्सव साजरा करतात तोच हा दिवस. आपली बरीचशी अर्थव्यवस्था आणि जीवनशैली समुद्राच्या कृपेवर अवलंबून आहे. समुद्र हे आपले एक मोठे संसाधन आहे. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
एक अतूट बंधन
रक्षण करते प्रेमाचे
भावाचे आणि बहिणीचे
नाते शताजन्मीचे
असेच बंधन बांधू सारे
बंधुत्वाचे प्रेमाचे
देशबांधव सारे आपण
रक्षण करूया देशाचे
भारत माता की जय
गुंजन हरी देव
सातारा

खूप सुंदर लेख.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete