गोपाळकाला.






आज गोपाळकाला. कुणी  घरून पोहे आणले कुणी दुध, कुणी दही, कुणी शेंगदाणे, कुणी लाह्या आणल्या, कुणीतरी लोणचे आणले. कोणत्याही वस्तू ठरवून व प्रमाणात आणल्या नाहीत.

 एका मोठ्या पातेल्यात हे सर्व घटक एकत्र केले. तयार झाला दहीकाला. कृष्णाला नैवेद्य दाखवला व काल्याचे प्रसादात रूपांतर झाले. सगळे पदार्थ एकमेकांत मिसळून गेले.


कोणाचीही स्वतंत्र चव उरली नाही. सगळ्यांचा मिळून एक अनोखा स्वाद तयार झाला. हीच आहे आमची संस्कृती आणि हाच आहे आमचा संस्कार. असाच तयार झाला आहे आमचा समाज. 

समानता म्हणजे कायद्याच्या दृष्टीने  सर्व स्त्री/पुरुष अथवा अनेक जातीपंथाचे  बांधव, सगळे एका पातळीवर आणि मग सगळ्यांना सारखी वागणूक आणि न्याय असा आहे. पण समानतेच्या पुढे जाऊन आम्हाला समरसता हवी आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या सुख - दु:खाशी एकरूप होऊन जाईल, एकमेकांवर कुटुंब भावनेने प्रेम करायला लागेल आणि मग खऱ्या अर्थाने एकजीव होईल.  सर्व संत, ईश्वराचे अवतार, ऋषी एका जाती पंथाचे  नव्हते त्यांना तशी बंधने घालणे  बरे नाही कारण त्यांनी अखिल मानव जातीच्या, अखिल विश्वाच्या उद्धराचे महान काम केले. त्यांच्या दिव्य आचरणातून ते महान झाले. 


मनुष्याचा इतिहास काहीही असो तो आपल्या कर्माने आणि कर्तृत्वाने मोठा होतो हाच आपला सोनेरी इतिहास आहे. या भूमीत पूर्वाश्रमीचा वाल्या कोळी प्रात: स्मरणीय ऋषी होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. वाईट गोष्टी व प्रथा, परंपरा काळाच्या ओघात निर्माण होतात. त्यांना उधृत करू नये असेही नाही. कारण त्यामुळेच त्यांना संपवता येते. पण हे करत असताना आपल्या मूळ दिव्य संस्कृतीचा विसर नको इतकेच.

आधुनिक काळात  महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,  यांचे महान कार्य प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.




भारत माता की जय

.. ..वंदे मातरम्.

भारत माता की जय

Comments

  1. खूप छान...लिखाण

    ReplyDelete
  2. Very beautiful write up and poem

    ReplyDelete
  3. Dahikala-
    Vividhta me Ekta
    Nice msg🙏🌹👍

    ReplyDelete
  4. सुंदर समतोल मांडणी. विशेषतः वाईट रुढींचा जो उल्लेख केला आहे तो संदर्भीय लिखाणात अतिशय योग्य व गरजेचा आहे. सर , अप्रतिम विचार मांडले आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी