उत्तम अभियंता काळाची गरज...जगाचा नियंता एक उत्तम अभियंता
१५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिन
कृपया लेखानंतरची कविता सुद्धा वाचा
ज्ञानप्राप्ती मुळे मनुष्य ज्ञानसंपन्न तर अनुभवामुळे अनुभवसिद्ध होतो. अनुभव व ज्ञान याचे योग्य मिश्रण जीवन जास्तीत जास्त समृद्ध करण्यासाठी अभियंत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.आहे त्या परिस्थितीत , उपलब्ध साधनसामुग्री मध्ये कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्च करून उत्तमात उत्तम पर्याय देतो तो अभियंता.
समस्यांचे व अशक्यतेचे शक्यतेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे अभियंता. सहजता हा त्याचा स्वभाव. चिकाटी हा त्याचा गुणधर्म. केवळ पुस्तकी ज्ञान (Theory) मधून उत्तम अभियंते घडत नाहीत. त्याला व्यवहारिकतेची जोड गरजेची असते. ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग झाला तरच त्याचे महत्त्व विषद होते (application of knowledge is most important.)
एखादी गोष्ट केवळ साध्य करणे हे अभियंत्याचे अंतिम ध्येय नसावे. कारण ती गोष्ट अजुन सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात असतो. अवघड गोष्टी सोप्या बनवताना सहजता जपणे हे अभियंत्याचे कौशल्य आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा समावेश होईल यासाठी तो झटत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल. कमी शिकलेले तसेच जुन्या पिढीतील ज्येष्ठ तसेच अगदी लहान बालके सुद्धा मोबाईल फोन सहजतेने हाताळतात.
चिकाटी आणि सातत्य याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. यासाठी कठोर मेहनत आणि साधना याशिवाय कोणताच पर्याय नाही. आपल्या कामामध्ये परिपूर्णता (Perfection), अचूकता आणण्यासाठी तो दिवस रात्र एक करतो.
नवी नवी आवाहने स्वीकारणे त्याला आवडते. कार्यशक्तीला कौशल्याची जोड लाभली तर उपयोगिता (Usability) वाढते. बरेच वेळा उत्पादनामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही पातळींवर समतोल साधावा लागतो. अशावेळी अभियंत्याचा अनुभव उपयोगी ठरतो.
बांधकाम,विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक, संगणक अशा विविध क्षेत्रांमध्ये अभियंते आपले मोलाचे योगदान देत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी अजूनही कुशल अभियंत्यांना खुणावत आहेत.
अभियंते घडवणारी शिक्षण पद्धती हा चर्चेचा एक वेगळा विषय ठरेल. अभासक्रमात आणि प्रशिक्षणात काळानुरूप बदल घडले नाहीत तर असे शिक्षण फोल ठरते. त्यामुळेच अभ्यासक्रमासोबत व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास, शारीरिक क्षमतेचा विकास यावर देखील भर असायला हवा. शिक्षण घेत असतानाच कारखान्यात प्रत्यक्ष अनुभव घेता आला तर अजूनच उत्तम. यासाठी शिक्षण घेताना प्रशिक्षण संस्था उत्तम हवी. तिथे असणारे प्राध्यापक , शिक्षक यांचा अनुभव, आधुनिक उपकरणे व साहित्य यांची उपलब्धता, इंडस्ट्री बरोबर असणारा संस्थेचा सहयोग या बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. नाहीतर बाहेरच्या दिखाव्याला भुलून प्रवेश घेतला जातो. परिणामी उद्दिष्ट पूर्ती होत नाही आणि दोष मात्र इंजिनिअरिंग क्षेत्राला दिला जातो. यासाठी सजगता तेवढीच महत्वाची आहे.
अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे मोठे योगदान आहे. आपले कौशल्य पणाला लाऊन यांत्रिकी, संगणक,.स्थापत्य, विद्युत ईत्यादी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे व भारतमातेच्या लौकिकात मोलाचा वाटा असणारे अभियंते राष्ट्राची शान आहेत.
अभियंता ही केवळ पदवी नाही.अभियंता हे केवळ पद नाही.अभियंता ही एक वृत्ती आहे.
जगभरात वेगवेगळ्या तारखेला अभियंता दिन)साजरा होतो. भारतात 15 सप्टेंबरला हा दिवस साजरा होतो. हा थोर अभियंते मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. त्यांच्या कार्याचा गौरव/सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा केला जातो.
जाणिवेचं ज्ञानात आणि ज्ञानाचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर म्हणजे इंजिनीअरिंग. पाच सेन्सेस म्हणजेच बघणे,ऐकणे,रस,स्पर्श गंध या पाच जाणिवा मनुष्याच्या ज्ञानप्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ कुठल्यातरी वासामुळे कुठेतरी वायर जळाली ईलेक्ट्रिकल इंजिनीयरला कळत .याचे उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर विश्वेश्वरय्या देता येईल . रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेचा आवाज थोडा बदललेला जाणवला आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे थांबवली चालकाला आश्चर्य वाटले पुढे काही अंतरावरच रेल्वे रूळ तुटला होता.
कौशल्य ज्ञान आणि अनुभवसिद्धता यांचा त्रिवेणी संगम उद्योगक्षेत्रात मोठी क्रांती घडवतो. मानवी जीवनाचा विकास घडवण्यासाठी अभियंते कटिबध्द आहेत. परंतु तंत्रज्ञान हे एक भूत आहे. ते जसे आयुष्य घडवते तसेच त्याच्यात विध्वंस आणि संहार करण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे सुरक्षित हातात असेल तरच विश्वाचे कल्याण आहे. त्यामुळेच भारतीय विचारांची विश्र्वकल्याणाची भूमिका महत्त्वाची आहे.
अभियंता एक जिद्द आहे काही नवीन व वेगळे करण्याची.या वृत्तीला , या जिद्दीला त्रिवार सलाम व डॉ विश्र्वेश्र्वरैया यांच्या पवित्र व प्रेरणादायी स्मृतीस विनम्र प्रणाम.
.Driving The Car of Progress
Applying The Top Gear
Keeping India ahead In The Race
To Be Proud Of an Engineer.
Solving The Problem
Observing the Facts
Till Best is To Be Achieved
Using Newer Tacts
Keeping Pace With ßTime
Making The Life Easy
Throughout The Day And Night
Schedule Is Busy
We Read The Situation
Keeping The Patience
Allow The Deviation
Strive For The Perfection
Keeping Aside The Stress
Releasing The pressure
Let's Work together
To Flourish The Nature
.....श्री.गुंजन हरी देव.
सातारा

खूप छान
ReplyDeleteसुंदर लेखन
ReplyDeleteखूप छान लेखन
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteछान लेखन सर
ReplyDeleteNice Egenaring day
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNice article
ReplyDeleteNice sir
ReplyDelete