मातृशक्तीचा वरदहस्त म्हणजेच महिला दिन जरूर वाचा
माता,भगिनिंविषयीचा आदर सर्वांनी, सर्व ठिकाणी व संपूर्ण वर्षभर जपणे ही भारतीय संस्कृती आहे.
माता, भगिनी, पत्नी, मैत्रीण, सहकारी अशा विविध रुपात समाज घडवणारी स्त्री भारतीयांना पूर्वीपासूनच आदर्शवत आहे.
असा हा पूर्वीपासून म्हटला जाणारा श्लोक आहे. पंचकन्यांचे केवळ स्मरण केले तर महापातकाचा नाश होतो . रामायण, महाभारतातल्या या स्त्री-व्यक्तिरेखा साऱ्यांच्याच आदर्श आहेत.
जिजाऊ मासाहेबांमुळे छत्रपती शिवराय घडले. ज्ञानेश्वर माऊलींना मुक्ताईने साथ दिली. पत्नीने दिलेल्या खंबीर साथीमुळे हजारो पुरुषांनी यशाचे शिखर गाठले.
स्त्रीला स्वतःचे असे वेगळे कर्तृत्व विश्व नक्कीच आहे. समाजाला दिशा व ज्ञान देण्याचे काम कुटुंबापासून सुरू होते ते करताना स्त्री सरस्वती असते. तिच्या दूरदर्शीपणा मुळे वैभव प्राप्त होते तेव्हा ती लक्ष्मी असते. आणि जेव्हा अन्याय अत्याचार पराकोटीला जातो तेव्हा ती दुर्गेचे रूप घेते . झाशीची राणी आम्हा सर्वांना आदर्शवत आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रात कल्पना चावला, सुनीता विल्यम्स खेळामध्ये मिताली राज, सानिया मिर्झा यांनी भारताचे नाव जगात उज्वल केले. मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी भारताचे राष्ट्रपती पद भूषवले.
प्राचीन वेदकालीन भारतात पार्वती, कौशल्या ,गार्गी, मैत्रेयी, अरुंधती अशा अनेक कर्तृत्ववान महिला होत्या.
लिज्जत पापड समुहात सात महिलांनी एकत्र येऊन ऐंशी रुपये भांडवल घालून सुरू केलेला एक उद्योग आज यशाच्या शिखरावर आहे.
मातृशक्ती ही या देशाची परंपरा आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि या परंपरेनुसार आपापल्या क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत आमच्या देशाचे नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या सर्व माता, भगिनिंच्या कार्याला त्रिवार वंदन.
जगात सगळे चांगले किंवा सगळेच वाईट असे नसते. आमच्याही काही सामाजिक उणिवा असतील, आम्ही सुद्धा काही चुका केल्या असतील परंतु आमचे वैशिष्ठ्य म्हणजे आम्ही त्यांचे समर्थन करत नाही त्या मान्य करून आवश्यक त्या सुधारणा करणारा आमचा भारतीय समाज आहे. आमची लढाई केवळ समानतेची नाही. तर ती कल्याणकारी शक्ती आणि विघातक शक्ती यांमधली आहे. त्यामुळे नर आणि नारी म्हणजेच शिव(सत्य) आणि शक्ती दोघांच्या मुळे विश्वाचा समतोल आहे हे आम्ही जाणतो.
राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि या परंपरेनुसार आपापल्या क्षेत्रात2 यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत आमच्या देशाचे नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या सर्व माता, भगिनिंच्या कार्याला त्रिवार वंदन.
माता भगिनिंचा आदर आणि सन्मान म्हणजेच महिला दिन....अगदी नित्याचाच.
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
गुंजन हरी देव
सातारा
जय हिंद
भारत माता की जय !!


👍👍👍
ReplyDelete🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर शब्दात आजच्या दिनानिमित्त महिलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे 👍👌
ReplyDelete