भाग २ सलोकता

 


मुक्ती म्हणजे सकारात्मकता. भरकटलेल्या विचारांपासून मुक्तता म्हणजे मुक्ती. आपल्याला ध्येयाच्या दिशेने नेणारी योजना म्हणजे मुक्ती. यासाठीचे चार टप्पे म्हणजे चत्वार मुक्ती.. . .

[१] सलोकता

२] सरुपता

[३] समीपता

[४]सायोज्य मुक्ति

असे मुक्तिंचे चार प्रकार आहेत. 

सलोकता मुक्ती

विचारांशी, ध्येयाशी सुसंगत वातावरणात वास्तव्य करणे म्हणजे सलोकता. ज्या देवाचे भजन करावे त्या देवाच्या/भक्तांच्या सहवासात राहणे, ह्याला "सलोकता " असे म्हणतात. 

लोकीं राहावें ते स्वलोकता ।.... ग्रंथराज दासबोध

संगती संग दोषेण... या उक्तीप्रमाणे माणसाने आपल्या ध्येयाचा विचार करून त्या ध्येय प्राप्तीसाठी अनुकूल असा समुदाय निवडावा. तेथे वास करावा. 

अखंड तोच विचार, तेच अनुकूल वातावरण यामुळे ध्येयाविषयीचा आत्मविश्वास दृढ होतो. परिणामी ध्येयापासून भरकटविणाऱ्या इतर विचारांपासून सुटका होते. ध्येयापासून मागे फिरण्याचे सर्व दोर कापले जातात. आणि एक उत्तम सुरुवात होते.

ज्याचे ध्येय आराध्य प्रभू राम असेल त्याने अखंड रामसेवा असेल असे स्थान, तीर्थक्षेत्र निवडावे. अखंड रामकार्य, रामसेवा, रामस्मरण घडायला हवे याची दक्षता घ्यावी.

भारतीय हिंदू तत्वज्ञान जगायला प्रेरित करते आणि मनुष्यामधील सकारात्मकता जागवते. सलोकता शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे लोकात असणे. ज्याला उत्तम गायक व्हायचे त्याने गायकांच्या संगतीत, ज्याला उत्तम चित्रकार व्हायचे त्याने चित्रकारांच्या संगतीत जाऊन राहायला हवे.

सलोकता म्हणजे सहवास प्राप्त होणे. त्यामुळे निरीक्षण घडते, बारकावा कळतो, ज्ञानात भर पडते. आपल्या आवडीचे वातावरण लाभल्यामुळे साहजिकच ऊर्जेचा संचार होतो.

श्री. गुंजन हरी देव.

सातारा

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी