चत्वार मुक्ती भाग ५ सायोज्यता
अध्यात्मिक प्रगतीमध्ये चार महत्त्वाच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. ज्या देवाची भक्ती करायची त्यासंबंधित वातावरणात राहणे म्हणजे सलोकता, हळूहळू देवाची जवळीक निर्माण करणे म्हणजे समीपता, देवाच्या इतके जवळ जाणे म्हणजे देवत्वच पाहुणे त्याला स्वरूपता म्हणतात. चौथी मुक्ती म्हणजे सायोज्यता आहे. पहिल्या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत परंतु सायोज्यता अविनाशी आहे.
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥
निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता ।
सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- । निर्गुण भक्ती ॥
............ग्रंथराज दासबोध
ईश्वर निर्गुण निराकार आहे हे अंतिम सत्य आहे. निर्विकल्पाला कल्पावे कोण्याप्रकरे , निराकार साकार कसे झाले याचे उत्तम मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामी दासबोध या ग्रंथात करतात.
पहिल्या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत परंतु सायोजुमुक्ती अविनाशी आहे.
तिहीं मुक्तीस आहे चळण । सायोज्यमुक्ती अचळ जाण ।
त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायोज्यमुक्ती चळेना ॥
एकंदर मुक्ति चार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्यमुक्ति मात्र अचल राहते, तिच्यांत फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्यमुक्तिमध्यें कोणताही फेरबदल होत नाही ती जशीच्या तशीच कायम राहते.
श्री गुंजन हरी देव
सातारा.

Comments
Post a Comment