धुंडी कळ्याना , धुंडी फुलांना.....
दिसलं म्हणून सुचलं ...
शब्द शब्द जपून ठेव.....
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का...
असं कोणीतरी देवाला आळवले आहे...
मग धुंदी फुलांना, धुंदी फुलांना बाजूला राहते.. देवाला धुंडता धुंडता देवासाठी फुले आणि कळ्या धुंडू लागतो .. मग सुरू होते
धुंडी कळ्याना , धुंडी फुलांना.
आपण बरोबर वाचले आणि लिहिलेले सुद्धा चुकीचे नाही... रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणारे सद्गृहस्थ चौफेर नजर फिरवित इतरांनी कष्टाने वाढवलेल्या झाडांची फुले धुंडीत असतात.
फुले सोडा पण कळ्या सुद्धा सोडत नाहीत. शिवाय झाडांचे हाल करतात. फांद्या तोडतात...
अशी फुले वाहून देव भेटेल का...
देव अशाने भेटायचा नाही रे...
देव बाजाराचा भाजीपाला नाही रे....
आपल्याला सुद्धा असा अनुभव आलेला आहे का ?
श्री. गुंजन हरी देव, सातारा

Comments
Post a Comment