शारदीय नवरात्र पुष्प ३ (आम्हाला प्रत्यक्ष दिसणारी/भेटणारी देवी म्हणजे आमची मातृशक्ती ).......

शारदीय नवरात्र पुष्प ३ (आम्हाला प्रत्यक्ष दिसणारी/भेटणारी देवी म्हणजे आमची मातृशक्ती  ).......


मातृशक्तीचे मूळ म्हणजे माता पार्वती. मूळ शक्तीची विविध रूपे म्हणजे माता लक्ष्मी, दुर्गा माता, सरस्वती माता. नवदुर्गा,  साडे तीन शक्तिपीठे ही सगळी ऊर्जेची केंद्र आहेत. पूर्वीच्या काळी स्त्री शक्ती जागृत होती.(ते पुढील भागात पाहू) पण प्रत्यक्ष आज, वर्तमानात आम्हाला या तेजाची अनुभूती घेता येते. 


आपल्या कर्तृत्वाने, ज्ञानाने , तेजाने, शौर्याने, धाडसाने,  पराक्रमाने, संयमाने स्वतःची ओळख निर्माण करणारी मातृशक्ती आम्हाला आदर्शवत आहे. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, न्यायाधीश, वकील, प्राध्यापक, पोलीस, सैनिक , शिक्षक, डॉक्टर, खेळाडू, शास्त्रज्ञ, गिर्यारोहक अशा विविध जबाबदाऱ्या पेलणाऱ्या आमच्या माता भगिनींचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सर्व सामाजिक घटक त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत. 



सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य होणार नाही म्हणूनच यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सर्व माता भगिनींसाठी प्रतिकात्मक कृतज्ञता व्यक्त करूया. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अनेक आघात सहन करून स्वतःला सावरून देशाला खंबीरपणे दिशा देणाऱ्या आमच्या मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांचा आम्हाला अभिमान आहे. देशाच्या प्रथम नागरिक मा.द्रौपदी मुर्मू यांनाआणि सर्व दुर्गा शक्तीला विनम्र प्रणाम....


श्री. गुंजन हरी देव.

सातारा

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी